धक्कादायक : भामरागड येथे आलेल्या सीआरपीएफच्या २२ जवानांसह एकाला कोरोनाची लागण

गडचिरोली (वृत्तसंस्था) शनिवारी रात्री उशिरा : सीआरपीएफच्या २२ जणांसह एकाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, या सर्व २३ जणांना गडचिरोली जिल्ह्यात आल्यानंतर भामरागड येथे क्वारंटाईन करण्यात आले होते.

 

यामधील 22 जवान सीआरपीएफ बटालियनचे तर 1 जण भंडारा जिल्ह्यातील असून ती व्यक्ती नोकरीनिमित्त रुजू होण्यासाठी भामरागड येथे दाखल झाली होती. जिल्ह्यात आल्यानंतर सीआरपीएफ जवानांना कृषी महाविद्यालय गडचिरोली येथे तर भामरागड येथील व्यक्तीला भामरागडमध्येच संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. या सर्व रुग्णांना आता जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. सीआरपीएफचे २३ जवान सुटीवर होते ते नागपूरवरून २७ जूनला सीआरपीएफच्या बसने जिल्ह्यात आल्यानंतर संस्थात्मक विलगीकरणात दाखल झाले. यातील २३ पैकी १८ पॉझिटीव्ह आढळले तर ५ निगेटीव्ह आले आहेत. तसेच ४ इतर जवान खाजगी वाहनाने इतर जिल्ह्यातून आले होते. त्यांचेही अहवाल पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. यानुसार एकूण २२ सीआरपीएफ जवान पॉझिटीव्ह आढळून आले आहे.

Protected Content