कारगिल येथे देश सेवा बजावणाऱ्या पुत्रास पित्याच्या अंतिम दर्शनाची ओढ

 

पाचोरा, प्रतिनिधी । तालुक्यातील  सातगाव (डोंगरी) येथील पांडुरंग विठ्ठल पाटील (वय-६५) यांची दि. २३ रोजी सकाळी पाच वाजता हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांना तीन मुले असून एक मुलगी आहे. त्यांचा लहान मुलगा कारगिलमध्ये देशसेवेचे कर्तव्य बजावीत असून तो घरी परतल्यावर पांडूरंग पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

पांडुरंग पाटील यांना तीन मुले असून एक मुलगी आहे. एक मुलगा नोकरी निमित्त औरंगाबाद येथे वास्तव्यास आहे. तर लहान मुलगा दिपक पाटील हा देश सेवेसाठी कारगिल या ठिकाणी सेवा बजावत आहे. दोन दिवसांपूर्वीच औरंगाबाद येथे वास्तव्यास असलेल्या मोठ्या मुलाच्या मुलीचे वाङ् निश्चयनिमित्त मयत पांडुरंग पाटील हे औरंगाबाद येथे गेले होते. दि.२३ रोजी सकाळी पाच वाजता पांडुरंग पाटील यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन होताच देशाच्या संरक्षणासाठी तैनात असलेला लहान मुलगा जवान दिपक यास प्रथम निधनाचा निरोप कळविण्यात आला. तेव्हा दिपकने मला वडिलांचे अंत्यदर्शन घ्यायची इच्छा आहे. मी आल्याशिवाय वडिलांचा अंत्यविधी करू नका अशी विनंती आपल्या दोन्ही भावांना केली. दोन्ही भावांनी दिपकच्या भावनेचा आदर करत अंत्यसंस्कार भाऊ आल्यावरच करू असा निर्णय घेतला. जवान दिपक हा कारगिल येथुन पित्याच्या अंतिम दर्शनासाठी रवाना झाला असुन ते आल्यानंतर दि. २४ रोजी संध्याकाळी सात वाजता अंत्यसंस्कार होणार आहे.

Protected Content