अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आगामी काळातील सण व उत्सव लक्षात घेता पोलीस स्टेशन हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, या हेतूने अमळनेर शहरात पथसंचलन करण्यात आले. सदरील पोलीस रूट मार्च हा पोलीस कवायत मैदानापासून सुरु करुन पवन चौक, झामी चौक, माळीवाडा, बहादरपुर नाका, भोईवाडा, कसाली डीपी, वाडी चौक, पान खिडकी, सराफ बाजार, दगडी दरवाजा व शेवटी समारोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, गांधलीपूरा पोलीस चौकी येथे येऊन पथसंचलनाची सांगता झाली.
अमळनेर पोलीस स्टेशनचे अधिकारी व अमलदार आणि रॅपिड अॅक्शन फोर्स (RAF) व RCP जळगांव अशांनी अमळनेर शहरातील संमिश्र वस्तीतून पोलीस रूट मार्च घेण्यात आला. याप्रसंगी विभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव, रॅपिड अॅक्शन फोर्सच डेप्युटी कमांडंट शशिकांत राय, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे, RAF चे निरीक्षक संतोष कुमार यादव, निरीक्षक राजकुमार सिंग, निरीक्षक बलकारसिंग, निरीक्षक अजयकुमार सिंग, मारवड पो. स्टे. सपोनि जयेश खलाने, पोलीस उपनिरीक्षक नरसिंह वाघ, महिला पोलीस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे, पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोड तसेच अमळनेर पोलीस स्टेशनचे ४५ अमलदार तसेच RPF चे ७० पुरुष कमांडो व ५ महिला कमांडो अशा ७५ जणांची तुकडी सह पोलीस रूट मार्च घेण्यात आला.
सदर रूट मार्च नंतर गांधलीपूरा पोलीस चौकीत शांतता कमेटीची बैठक पार पडली. यात डीवायएसपी श्री. राकेश जाधव, डेप्युटी कमांडंट शशिकांत राय, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी आगामी काळातील सण-उत्सव लक्षात घेता, शहरात शांतता अबाधित राहून कायदा व सुव्यवस्था कसा राखता येईल, याविषयी शांतता कमेटीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत शहरातील शांतता कमेटीचे सदस्य, माजी नगरसेवक, पत्रकार बांधव असे उपस्थितीत होते. सदर पोलीस रूट मार्च साठी सपोनि संजय पाटील, पो.ना. डॉ. शरद पाटील, पो.ना. दीपक माळी, पो.ना. रवि पाटील, पो.ना. सिद्धार्थ सिसोदे, पोहेकॉ मधुकर पाटील यांनी परिश्रम घेतले. सदर शांतता बैठकचे सूत्रसंचालन व आभार गोपनीय शाखेचे डॉ. शरद पाटील यांनी केले