कापूस विक्रीसाठी बाजार समितीत नोंदणी करण्याचे आवाहन

पारोळा प्रतिनिधी । ज्या शेतकर्‍यांना शासकीय कापूस खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी आणायचं असेल त्यांनी आधी बाजार समितीत नाव नोंदणी करावी व बाजार समितीने काळविल्या नंतरच कापूस विक्रीसाठी आणावे असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अमोल पाटील यांनी केले आहे.

तालुक्यात सीसीआय अंतर्गत पणन महासंघाचे तीन कापूस खरेदी केंद्र ही सुरू आहेत. या कापूस खरेदी केंद्रावर यापूर्वी सावळा गोंधळ हा उडाला होता. येथे शेतकरी, व्यापारी व जिनिंग चालक यामध्ये वाद उफाळून येत होता. हे वाद पुन्हा निर्माण होऊ नये, म्हणून बाजार समितीने शेतकर्‍यांना कापूस विक्री वाहन आणण्यापूर्वी नोंदणीचे सभापती अमोल पाटील, सचिव रमेश चौधरी व संचालक मंडळ यांनी आवाहन केले आहे. दरम्यान सध्या कापूस खरेदी ही बंद आहे. ती कधी सुरू होणार याकडे शेतकऱयांचे लक्ष लागून आहे.

Protected Content