कापुस कोंडी फोडण्यासाठी जगा आणि जगू मंचचा एल्गार

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कापसाला योग्य भाव मिळावा यासाठी पाचोरा शहरातील जगा आणि जगू द्या विकास मंचच्या वतीने धरणे आंदोलना सुरूवात केली आहे. शुक्रवारी २४ मार्च रोजी शेतकऱ्याचा एल्गार मोर्चा मंत्रालयात धडकणार आहे.

 

कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी जीवाचे राण करुन पिकविलेल्या कापूसाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या घरात लाखो क्विंटल कापुस पडुन आहे. या पडुन असलेल्या कापसामुळे शेतकऱ्यांना व त्यांच्या परिवारातील सदस्यांनी त्वचेच्या समस्या उद्भवत आहे. ही कापसाची कोंडी फोडण्यासाठी ‘जगा आणि जगू द्या विकास मंच’तर्फे पाचोऱ्यातून शेतकऱ्यांनी एल्गार पुकारण्यात आला असून दि. १९ मार्च पासून जगा आणि जगू द्या विकास मंचचे अध्यक्ष निळकंठ पाटील, उपाध्यक्ष गुलाबराव पाटील, सचिव कृष्णा वानखेडे यांनी तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात दि. २२ रोजी लाक्षणिक अन्नत्याग आंदोलन पुकारण्यात आला. तिसऱ्या टप्प्यात दि. २३ मार्च रोजी पाचोरा येथे जळगाव, धुळे, नंदुरबार, पाचोरा तालुक्यातील शेतकरी प्रत्येकी एक / दोन किलो कापूस आणून आंदोलन स्थळी एल्गार करणार आहेत. तर आंदोलनाच्या चौथ्या टप्प्यात दि. २४ रोजी हजारोंच्या संख्येने शेतकरी कापूस सोबत घेऊन थेट मंत्रालयावर धडकणार असल्याची माहिती आंदोलनकर्ते जग आणि जगू द्या विकासमंचचे अध्यक्ष निळकंठ पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

Protected Content