जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कानळदा-भोकर जिल्हा परिषद गटातील रस्ते दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने गुरुवार २२ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षणीय उपोषण करण्यात आले.
यावेळी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलेले आहे की, जळगाव तालुक्यातील कानळदा भोकर या जिल्हा परिषद गटातील रस्ते फार खराब झाले असून रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. यापूर्वी या गटातील रस्ते दुरुस्त करावी, या मागणीसाठी यापूर्वी निवेदन देण्यात आले आहे. या रस्त्यावरून शेतकऱ्यांना बैलगाडी, व दुचाकीवरून शेतातील मालवाहतूक कारणासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे, त्यामुळे त्यांना वेळेवर इच्छितस्थळी शेतमाल नेण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच रस्ते खराब असल्यामुळे नागरिकांना जाणे येण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे तालुक्यातील कानळदा-भोकर जिल्हा परिषद गटातील रस्ते दुरुस्त करावे, या मागणीसाठी गुरुवार २२ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे, जिल्हा संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख निलेश चौधरी, जळगाव शहर महानगर प्रमुख शरद तायडे, शिवसेना तालुकाप्रमुख उमेश पाटील यांच्यासह आदी शिवसैनिकांनी उपोषणात सहभाग नोंदवला होता.