कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठात अविष्कार स्पर्धेचे उद्घाटन

nmu new name

जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात प्रशाळेतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित अविष्कार संशोधन स्पर्धेत सुधारित नागरिक कायदापासून ते कलम ३७० पर्यंतचे विषय हाताळत विद्यार्थ्यांनी आपला अविष्कार सादर करत आजची तरुणाई ज्वलंत प्रश्नावर जागरूक असल्याचे दाखवून दिले.

विद्यापीठातील पदवी प्रदान सभागृहात कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्याहस्ते फित कापून स्पर्धेचे उदघाटन झाले. यावेळी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील प्रा.पी.पी.वडगावकर उपस्थित होते. या स्पर्धेत ११५ प्रवेशिकाद्वारे १७२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला या मध्ये १०८ पोस्टर व ०७ मॉडेल्सद्वारे आपले सादरीकरण केले. पदवी, पदव्युत्तर, पदव्युत्तर पदवी आणि शिक्षक अशा चार गटात झालेल्या अविष्कार संशोधन स्पर्धेत विद्यार्थ्यांनी पोस्टर व मोड्युल्सद्वारे अत्यंत नाविण्यपूर्ण संशोधन सादर केले. अभियांत्रिकी व तांत्रिकी, विज्ञान, पर्यावरण, कचरा व्यवस्थापन, कृषी, सामाजिक माध्यमे, सुधारित नागरिक कायदा, आंतरिक सुरक्षा, कलम ३७०, प्रादेशिक भाषा, ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था असे विविध विषय विद्यार्थ्यांनी हाताळले.

या स्पर्धेसाठी निरीक्षक म्हणून प्रा.एस.टी.इंगळे यांनी काम केले. विद्यापीठ प्रशाळा स्पर्धेचे समन्वयक म्हणून प्रा.अजय सुरवाडे, उप समन्वयक म्हणून प्रा.जितेंद्र नारखेडे यांनी काम पाहिले. संपूर्ण अविष्कार स्पर्धेसाठी समन्वयक म्हणून प्रा.एस.आर.चौधरी व उपसमन्वयक म्हणून प्रा.ए.जी.इंगळे काम पाहत आहेत. ७ व ८ जानेवारी रोजी विद्यापीठस्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धा होणार आहे.

Protected Content