लक्झरी चालकाला चौघांकडून बेदम मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील आयएमआर महाविद्यालयाजवळ गाडी अडविण्याच्या कारणावरून ९ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास खासगी ट्रॅव्हल्स चालकाला चार जणांकडून बेदम मारहाण करून दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बुधवारी १० जानेवारी रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, शेख वसीम शेख मुबीन वय २८ रा. फर्दापूर ता. सोयगाव जिल्हा. छत्रपती संभाजी नगर हा तरूण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. संगीतम ट्रॅव्हल्सवर ते चालक म्हणून ते नोकरी करतात. नेहमीप्रमाणे मंगळवारी ९ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास लक्झरी क्रमांक एमएच १९ सीवाय ५२२२ वर चालक म्हणून शहरातील आयएमआर महाविद्यालयाजवळून जळगाव येथून पुण्यात जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी आही तरूणांनी त्यांची लक्झरी आडविली. याचा जाब चालेक शेख वसीम शेख मुबीन यांनी विचारला. याचा राग आल्याने सुनिल जगन तेली (वय-४९), तेजस सुनिल तेली (वय २२), वरून सुनिल तेली (वय २०) आणि आकाश संजय पाटील (वय-२०) सर्व रा. कोल्हे हिल्स, जळगाव यांनी चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. याप्रकरणी बुधवारी १० जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता मारहाण करणाऱ्या चौघांविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल हे करीत आहे.

Protected Content