जळगाव (प्रतिनिधी) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊन काळात अनेक परिवारांची आर्थिक अडचण झाली आहे. काथार वाणी समाजातील गरजू कुटुंबांना मोनाली कामळस्कर फाऊंडेशनकडून मदतीचा हात देण्यात आला आहे.
लॉकडाऊन काळात अनेकांचा रोजगार गेल्याने घरात आर्थिक चणचण जाणवू लागली. काथार वाणी समाजातील अशा गरजू कुटुंबांची अडचण लक्षात घेतली असता शंभरच्या जवळपास कुटुंब समोर आली. आपण समाजाचे देणे लागतो या उदात्त भावनेतून त्या कुटुंबांना मोनाली कामळस्कर फाऊंडेशनकडून किराणा मालाचे किट देण्याचे निश्चित करण्यात आले. समाजातल्या या कुटुंबांना दररोज ३० याप्रमाणे बोलावून त्यांना किराणा किट वितरित करण्यात आले. ज्या कुटुंबांना साहित्य घेऊन जाणे शक्य नव्हते त्यांना घरपोच किट पोहचविण्यात आले.
८८ कुटुंबांना मिळाला लाभ
राधाकृष्ण मंगल कार्यालयात तीन दिवसात भरारी फाऊंडेशनचे दीपक परदेशी, कृषी विभागाचे उपसंचालक अनिल भोकरे, अधीक्षक के.एस.ठाकूर, फाऊंडेशनचे अध्यक्ष नंदकिशोर कामळस्कर, रविंद्र वाणी, सुधाकर वाणी यांच्या उपस्थितीत ८८ कुटुंबांना किराणा किटचे वितरण करण्यात आले. उपक्रमासाठी अविनाश बडगुजर, राधेश्याम व्यास, चंद्रकांत वाणी (पनवेल) विनय सुलोचने (ठाणे), शरद वाणी, हेमंत कामळस्कर, चंदन असोदेकर, किशोर वाणी, संतोष वाणी, योगेश वाणी, रविंद्र वाणी, राजेंद्र असोदेकर यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वासुदेव वाणी, अनंत कश्यप, राजेश वाणी, अजय कामळस्कर, रवींद्र वाणी, राहुल हरणे, शंकर वाणी, अनिल वाणी, विजय वाणी, वासुदेव वाणी यांनी परिश्रम घेतले.