जळगाव प्रतिनिधी । शहरातील कांताई सभागृहात मजरूह ॲकडमीतर्फे ३ जानेवारी रोजी नऊ कविवर्य व उर्दू साहित्यांचा निशान ए मजरूह पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला इकराचे अध्यक्ष अब्दुल करीम सलार आणि मानियार बिरादरीचे फारूख शेख यांची उपस्थिती होती. सर्वप्रथम हाफिज मुश्ताक यांनी कुराण पठण केले. फारुक शेख यांच्या हस्ते द्विपप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर औरंगाबादचे डॉ. दोस्त मोहम्मद खान, बंगाली असोसिएशनचे महेंद्र माहिटी व मजरूर अकॅडमी चे अध्यक्ष डॉ शाफिक नाजीम यांची उपस्थिती होती.
मजरुहचे अध्यक्ष डॉ. शफिक नाजिम यांनी नऊ साहित्यिकांविषयी थोडक्यात माहिती सांगितली. या पुरस्कारार्थीना निशान हे मजरूह पुरस्कार बद्दल मेमोनटो, शाल व बुके देऊन मुफ्ती हारून, करीम सालार, फारुक शेख, डॉ. दोस्त मोहम्मद खान व महेंद्र मायटी यांच्या हस्ते गौरवण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मजरुह अकादमीचे शफिक नाजिम, रशीद पिंजारी, काजी रफिक, बाबा मलिक व इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.