कांताईबंधाऱ्यात पाय घसरल्याने तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । कुटुंबियांसोबत दुचाकीवर कांताईबंधाऱ्यावर फिरणासाठी गेलेल्या तरूणाचा पाय घसरल्याने पाण्यात पडून वाहून गेल्याची घटना आज दुपारी घडली. तरूणाचा मृतदेह शोधण्याचे कार्य सुरू आहेत.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, मुकेश मोरे (वय-२२) रा. पाळधी ता.धरणगाव हे जैन इरिगेशन कंपनीत एसडब्ल्यूआर ईलेक्ट्रिक विभागात गेल्या चार वर्षांपासून नोकरीला आहे. आज विरंगुळा म्हणून पत्नी व दोन मुलांसोबत दुचाकीने कांताईबंधाऱ्यावर आले. दुपारी जेवण झाल्यानंतर जेवणाचा डबा धुण्यासाठी कांताई बंधाऱ्याच्या किनाऱ्यावरून खाली उतरले. दरम्यान, त्यांचा पाय घसरल्याने ते वाहत्या पाण्यात पडले. पाणी वेग जास्त असल्याने ते पाण्यात वाहून गेले. ही घटना दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, पती मुकेश पाण्यात पडल्याचे लक्षात येताच पत्नीने आरडाओरड केल्याने परिसरातील काही नागरिकांनी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच जि.प.सदस्य प्रताप पाटील, पाळधी खुर्दचे सरपंच सोपान पाटील, पाळधी बुचे सरपंच चंद्रकांत पाटील, पाळधी पोलीस स्टेशनेचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली. सायंकाळी ७ वाजेपर्यंत मृतदेह शोधण्याचे काम सुरू होते. मयताच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

Protected Content