काँग्रेसच्या दोन बंडखोर आमदारांचे पक्षातून निलंबन; रणदीप सुरजेवाला यांची घोषणा !

जयपूर (वृत्तसंस्था) पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत बंडखोर आमदार भंवरलाल शर्मा, विश्वेंद्र सिंह यांचे काँग्रेस पक्षातून निलंबन करण्यात आले आहे. काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस आणि प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आयोजित पत्रकार परिषदेत आज (शुक्रवार) आमदारांच्या निलंबनाची घोषणा केली.

 

राजस्थानमध्ये राज्य सरकारवरील अस्थिरतेचं संकट अद्यापही कायम असून रोज नाट्यमय घडामोडी घडत आहेत. याचदरम्यान एका ऑडिओ क्लिपमुळे राजस्थानमधील राजकारणात खळबळ माजली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत जयपूरमधील संजय जैन यांच्या मार्फत काँग्रेस आमदार भवरलाल शर्मा यांच्या संपर्कात असल्याचा दावा आहे. काँग्रेसने या ऑडिओ क्लिपची दखल घेतली असून आमदार विश्वेंद्र सिंह आणि भवरलाल शर्मा यांचं काँग्रेस पक्षाचं प्राथमिक सदस्यत्व रद्द केले आहे. राजस्थान उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज दुपारी सुनावणी होण्यापूर्वीच काँग्रेसने सचिन पायलट यांना एक झटका दिला आहे. या संपूर्ण कटात केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांचा हात असल्याचा आरोप रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. त्यांच्यावर त्वरित एफआयआर दाखल करावा आणि अटक करण्यात यावी. या संपूर्ण प्रक्रियेत केंद्र सरकारचे कोणते लोक सामील आहेत, याचा तपासात खुलासा झाला पाहिजे,अशी मागणी देखील सुरजेवाला यांनी केली आहे.

Protected Content