विधानसभा अध्यक्ष निवडणूकीसाठी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळांने घेतली राज्यपालांची भेट

मुंबई वृत्तसंस्था | राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला शेवटचे दोन दिवस बाकी असून पूर्णवेळ अध्यक्षपदासाठी निवडणूक या दोन दिवसांमध्ये पार पडावी, यासाठी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली.

अर्धा तास चर्चा झालेल्या या चर्चेत राज्यपाल सकारात्मक असल्याचं सांगत राज्यपाल यांनी सरकारच्या प्रस्तावावर चर्चा करून उद्या निर्णय कळवणार असल्याचे नेत्यांनी सांगितले. ‘बिगर अध्यक्षांची विधानसभा कशी चालेल?’ हा प्रश्न समोर असल्यामुळे राज्यपाल उद्याच विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर करतील असे अशीही त्यांना विनंती करण्यात आलीय. ते हा कार्यक्रम मंजूर करतील हा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. तर “निवडणूकी संदर्भात राज्यपाल यांनी सरकारला पाठवलेल्या पत्राच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी पाठवलेलं पत्र त्यांना दिलं असून ‘कायदेशीर चर्चा करुन यावर उद्या निर्णय कळवतो’ असे राज्यपाल बैठकीत बोलल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

महाविकास आघाडीच्या शिष्ठमंडळाकडून राज्यपाल यांना निवेदन देण्यात आलंय. याप्रसंगी राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे उपस्थिती होती.

Protected Content