Home Cities जळगाव कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठात पथनाट्याचे सादरीकरण

कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठात पथनाट्याचे सादरीकरण


जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्र प्रशाळेच्या समाजकार्य विभागाच्यावतीने “जागर स्त्री विचारांचा” या विषयावर पथनाट्य सादर केले.

जागतिक महिला दिनानिमित्त मयूर माळी, संजय पावरा, गिरीष बेहरे, रोहण अवचारे, जयश्री देवरे, गिताई ठाकुर, निशिगंधा सोलंके, नीलेश निकुंभ, अजय चंदनशिव, मयूर परदेसी या विद्यार्थ्यांनी ग्रामिण भागातील वैजनाथ, टाकरखेडा, बांभोरी, भोकणी, टहाकळी, चिंचपूरा, पोखरी तांडा, खर्ची तर जळगाव शहरातील शहर बस स्थानक, रेल्वे स्टेशन, बेंडाळे महिला महाविद्यालय या ठिकाणी सहा.प्रा. वनश्री बैसाणे, सहा.प्रा. दीपक सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पथनाट्य सादर केले.            


Protected Content

Play sound