कलाशिक्षक सुनील दाभाडे यांना राष्ट्रीय इ-पोस्टर स्पर्धेत उत्तेजनार्थ प्रमाणपत्र

जळगाव, प्रतिनिधी । डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय इ-पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यास्पर्धेत जळगावचे सुनील न्हानू दाभाडे यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने स्वदेश संस्थान, इंडिया, भाभा विज्ञान क्लब व शांती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय इ-पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मानव सेवा शाळेतील कलाशिक्षक सुनील दाभाडे यांनी सहभाग घेतला होता. त्यांना उत्तेजनार्थ प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Protected Content