कर्मचाऱ्यांना सण अग्रिम, थकित महागाई भत्त्याची रक्कम त्वरीत अदा करा

 

जळगाव, प्रतिनिधी । कोरोना काळात महापालिकेचे डॉक्टर्स, नर्सेस व इतर अधिकारी व कर्मचारी यांनी अहोरात्र नागरिकांची व रुग्णांची सेवा केली असून काही दिवसांवर दिपावलीचा सण येऊन ठेपल्याने या सर्वांना अग्रिम, थकित महागाई भत्त्याची रक्कम व चालु महिन्याचे वेतन आदी देय रक्कम अदा करण्यात यावी अशी सूचना महापौर भारती सोनवणे यांनी आयुक्तांना पत्राद्वारे केली आहे.

महापौर भारती सोनवणे यांच्या पत्राचा आशय असा की, देशासह जळगाव शहरात कोरोना प्रादुर्भाव पसरलेला होता. अश्या बिकट प्रसंगी आपले महापालिका डॉक्टर्स, नर्सेस व इतर सर्व अधिकारी कर्मचारी यांनी अहोरात्र नागरीक व रुग्णांंना सेवासुविधा पुरवित आहे. सद्यस्थितीत देशात प्रमुख सण दिपावली हा काही दिवसांवरच आलेला आहे. याकरीता अश्या शुभ प्रसंगी सेवानिवृत्त व कार्यरत मनपा अधिकारी कर्मचारी यांना सणउत्सव साजरा करणेच्या दृष्टीने सण अग्रिम, थकित महागाई भत्त्याची रक्कम, व चालु महिन्याचे वेतन इत्यादी त्वरीत अदा करण्यात यावेत अशी सूचना महापौर भारती कैलास सोनवणे यांनी आयुक्तांना दिली आहे.

Protected Content