भाजप महानगरच्या संयोजकपदी दीपक साखरे

deepak sakhare 1

deepak sakhare 1

जळगाव प्रतिनिधी । आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर, आज भाजप जळगाव महानगरच्या संयोजकपदी दीपक साखरे यांची नियुक्ती करण्यात आली.

आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर, आज भारतीय जनता पक्षातर्फे जिल्हा कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली. याप्रसंगी विभागीय संघटन मंत्री किशोर काळकर, जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील, जिल्हा सरचिटणीस प्रा. सुनील नेवे, पोपट भोळे, हर्षल पाटील आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी पक्षाची मतदारसंघनिहाय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात प्रत्येक मतदारसंघाचा प्रभारी, संयोजक, सहसंयोजक आणि विस्तारक या पदांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. यात जळगाव महानगरच्या संयोजकपदी दीपक साखरे यांची नियुक्ती करण्यात आली. महानगरच्या प्रभारीपदी गोविंद अग्रवाल, सहसंयोजकपदी विजय वानखेडे तर विस्तारक म्हणून सचिन पानपाटील यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.

दरम्यान, उर्वरित जिल्ह्यात चाळीसगावच्या प्रभारीपदी सदाशिवआबा पाटील, संयोजक पोपटतात्या भोळे, सहसंयोजक घृष्णेश्‍वर पाटील तर विस्तारक म्हणून गिरीश बर्‍हाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अमळनेरमध्ये प्रभारी सुरेंद्रकुमार बोहरा, संयोजक व्ही.आर. पाटील, सहसंयोजक लालचंद सैनानी तर विस्तारक म्हणून गुलाब पाटील काम पाहतील. रावेरचे प्रभारी म्हणून शांताराम पाटील, संयोजक सुरेश धनके, सहसंयोजक हिरालाल पाटील तर विस्तारक म्हणून विलास पाटील काम पाहणार आहेत. भुसावळ मतदारसंघाचे प्रभारी हर्षल पाटील, संयोजक सुनील महाजन, सहसंयोजक वसंत पाटील तर विस्तारक दिनेश नेमाडे आहेत. जामनेर मतदारसंघाचे प्रभारी अजय भोळे, संयोजक शिवाजी सोनार, सहसंयोजक तुकाराम निकम तर विस्तारक नवलसिंग राजपूत हे असणार आहेत. तसेच मुक्ताईनगराचे प्रभारी म्हणून प्रा. सुनील नेवे, संयोजक रमेश ढोले. सहसंयोजक शिवाजीराव पाटील तर विस्तारक विलास धायडे अशी नियुक्ती करण्यात आली आहे.

दीपक साखरे यांच्या नियुक्तीबद्दल जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन, माजी मंत्री एकनाथराव खडसे, ना. हरीभाऊ जावळे, खासदार उन्मेष पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार राजूमामा भोळे, आ. चंदूभाई पटेल, आ. संजय सावकारे, आ. स्मिताताई वाघ यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Protected Content