चाळीसगाव, प्रतिनिधी | कर्नाटक राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांनी विटंबना केली. यामुळे अशांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी विविध सामाजिक संघटनेकडून निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
संपूर्ण जगाचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजकीय मुद्दा बनवून काही समाजकंटकांनी कर्नाटकात त्यांच्या पुतळ्याची विटंबना केली. या घटनेला घेऊन ठिकठिकाणाहून जाहीर निषेध नोंदवत कारवाईची मागणी केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून चाळीसगाव येथील सामाजिक संघटना रयत सेना व अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने तहसीलदार अमोल मोरे व पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांना निवेदन देत तातडीने महाराजांची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा या सामाजिक संघटनेकडून देण्यात आला आहे.
निवेदनावर रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, वीर भगतसिंग परिषदेचे पंकज रणदिवे, मराठा सेवा संघाचे अरुण पाटील, प्रगत संस्थेचे खुशाल पाटील, रयत सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सुमित भोसले, जिल्हाध्यक्ष संजय कापसे, ज्ञानेश्वर कोल्हे, भाऊसाहेब पाटील, स्वप्निल गायकवाड, छोटू अहिरे , दीपक देशमुख ,प्रदीप मराठे ,प्रकाश पाटील, दिलीप पवार, भुषण पाटील, ज्ञानेश्वर सोनार, सुनिल पवार , विलास पाटील,हितेंद्र मगर, प्रशांत आजबे ,मुकुंद पवार, राकेश बोरसे ,दिनेश चव्हाण, भरत नवले ,विकास पवार, राजेंद्र पगार ,सागर गवळी, भैय्यासाहेब पाटील, प्रवीण पाटील, नितीन पाटील ,सोनू देशमुख तर अखिल भारतीय मराठा महासंघाकडून खुशाल बिडे ,जगदीश वाघ, रामचंद्र सुर्यवंशी, विजय पाटील, नामदेव तूप, गणेश गुंजाळ, मोतीराम मंडोले, सतीश मराठे, पंडित पाटील, रमेश पाटील, संजय पाटील, चेतन निकुभ, अविनाश कोल्हे, सागर बोरसे, खुशाल पाटील, पुंडलिक थोरात, हिरामण मांढरे आदींनी सह्या केल्या आहेत.