धरणगाव, प्रतिनिधी । कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेतर्फे वृक्षरोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पी. आय. पवन देसले, कवी संजीव कुमार सोनवणे संस्था अध्यक्ष सुनील चौधरी आदी उपस्थित होती.
कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेतर्फे आयोजित वृक्षरोपणप्रसंगी उदयोन्मुख इंग्रजी कवि देवश्री रमेश महाजन हिने इंग्रजी मध्ये 10 कविता लिहिलेल्या आहेत.
त्यानिमित्त नायब तहसीलदार प्रथमेश मोहळ व पी. आय. पवन देसले यांनी तिचा सत्कार केला. कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेचा वतीने तिला किरण बेदी यांचे ‘आय डेअर’ नावाचे पुस्तक देण्यात आले. ती पोदार स्कूल जळगाव या ठिकाणी ती इ. १०वीला शिकत आहे. बालकवी ठोंबरे प्रा. शाळा व सारजाई कुडे विद्यालय येथील आर.डी. महाजन व कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय धरणगाव येथील प्रा. कविता महाजन यांची ती मुलगी आहे. स्वामी समर्थ नगर येथील रहिवासी परमेश्वर रोकडे यांनी कोरोनावर गीत रचले व ते सोशल मीडियावर सादर केल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्र संचालन विलास महाजन यांनी केले. आभार सुनील चौधरी यांनी मानले. याप्रसंगी आनोरा शाळेचे मुख्याध्यापक एम. च. चौधरी, एस. जी. पवार, राजेंद्र पवार, आर. डी. महाजन, अलिम शिरपूरकर, शांताराम जाधव, अनुपम अत्तरदे, नारायण वाणी, डी. एन. चौधरी, जितेंद्र महाजन, दिलीप मोरे, कैलास पवार, आर. एम. चौधरी, पी. पी. रोकडे, आर. जी. देवरे, बी. आर. महाजन, कल्पेश महाजन, प्रकाश मुसळे, भूषण महाजन उपस्थित होते. यशस्वी होण्यासाठी सर्व नगरवासी यांनी मेहनत घेतली.