रावेर (प्रतिनिधी) फैजपुर प्रांतधिकारी डॉ.अजित थोरबोल यांच्या सूचनेवरुन वाहन चालक उमेश तळेकर यांनी रावेरमध्ये काही लोकांना कोरोना वायरस पासुन बचावासाठी मास्क बांधण्याचे सांगितल्यानंतर त्यांच्या सोबत काही लोकांनी गैरवर्तन करून हुज्जल घातली होती. याचा निषेध म्हणून आज रावेर-यावल तलाठी संघटनांनी उप विभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांना निवेदन देऊन निषेध केला आहे.
काल दि 6 रोजी फैजपुर प्रांतधिकारी डॉ अजित थोरबोले कोरोना वायरस पार्श्वभूमीवर रावेरमध्ये आले होते. त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात काही फळविक्रेत्यां समोर गर्दी दिसून आली. यावेळी सोशल डिस्टसिंग ठेवा, मास्क वापरा याबाबतच्या सुचना प्रांतधिकारी देत असतांना त्यांचे वाहन चालक उमेष तळेकर यांच्याशी काही जणांनी हुज्जत घातली होती. याबाबत रावेर पोलिसात तीन जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच घटनेचा निषेध म्हणून आज तलाठी संघटना,महसुल कर्मचारी संघटना चर्तुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना व कोतवाल संघटना यांच्यातर्फे निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे. यावेळी डिवायएसपी नरेंद्र पिंगळे यांना निवेदन देण्यासाठी रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे, यावल तहसिलदार श्री.कुंवर, रावेर व यावल तलाठी संघटनेचे अध्यक्ष हनिफ तडवी,दीपक गवई, महसूल कर्मचारी संघटने अध्यक्ष संदीप जयस्वाल, शिरस्तेदार साळुंखे, रशिद तडवी सर्व तलाठी ,मंडळ अधिकारी,लिपिक,आदी उपस्थित होते.