Home क्राईम कर्जाची परतफेड २०१८ या वर्षातच केलेली आहे – सागर...

कर्जाची परतफेड २०१८ या वर्षातच केलेली आहे – सागर भंगाळे

0
105


जळगाव : प्रतिनिधी । शहरातील व्यावसायिक भागवत भंगाळे यांना बी एच आर पतसंस्थेत झालेल्या घोटाळ्याच्या संदर्भाने पोलिसांनी फक्त चौकशीसाठी बोलावले होते . त्यांनी पूर्ण कर्जाची  परतफेड २०१८ या  वर्षातच  केलेली आहे असा खुलासा सागर भंगाळे यांनी केला आहे

 

आज जळगाव शहरात बी.एच.आर. घोटाळ्यात  झालेल्या कारवाईत भागवत भंगाळे यांना चौकशीसाठी बोलाविण्यात आले होते

 

भागवत भंगाळे यांनी बी.एचआर. पतसंस्थेतून  २५ लाख रुपये  कर्ज घेतले होते, जे संपूर्ण कर्ज नियमानुसार सन २०१८ मध्ये अदा केले आहे. तसा निरंक – ना हरकत दाखला पतसंस्थेने दिलेला असून कर्जापोटी तारण ठेवलेल्या मालमत्तेवरील बोजासुद्धा पतसंस्थेतर्फे हटविण्यात आलेला आहे , असे निवेदन सागर  भंगाळे यांनी प्रसिद्धीस दिले आहे  .

 


Protected Content

Play sound