करूणा डहाळे यांना मुख्याधिकारी म्हणून पुन्हा नियुक्त करण्यात यावे-कोठारी ( व्हिडीओ )

भुसावळ संतोष शेलोडे । सध्या सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आलेल्या मुख्याधिकारी करूणा डहाळे यांना या पदावर पुन्हा कायमस्वरूपी नियुक्त करण्यात यावे अशी मागणी नगरसेवक निर्मल उर्फ पिंटू कोठारी यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

भुसावळ पालिकेला कायम मुख्याधिकारी मिळावे, तीन महिन्यांसाठी सक्तीच्या रजेवर पाठविलेल्या मुख्याधिकारी करुणा डहाळे यांना पुन्हा पदभार द्यावा, अशी मागणी नगरसेवक निर्मल उर्फ पिंटू कोठारी यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. या संदर्भात कोठारी यांनी निवेदनात म्हटले आहे की, शहरातील वाढत्या कोरोना रुग्णांचे खापर मुख्याधिकारी करुणा डहाळे यांच्या एकट्यावर फोडून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले गेले. त्यांच्या कार्यकाळात दररोज २५० ते ३०० स्वॅब घेतले जात होते. यामुळे रुग्णांची संख्याही वाढत होती. डहाळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवून उपजिल्हाधिकारी किरण सावंत पाटील यांना पदभार देण्यात आला होता. आता पुन्हा पाटील यांच्याकडील पदभार चोपडा येथील मुख्याधिकार्‍यांना देण्यात आला आहे. ते शहरात केवळ दोन दिवस वेळ देणार आहेत. भुसावळ सारख्या मोठ्या शहराला पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने कोरोनाच्या तसेच पावसाळ्यातील आपत्कालीन स्थितीत पालिका स्तरावरील निर्णय घेण्यास मोठे अडथळे निर्माण होऊ शकतील.

करूणा डहाळे यांच्या कार्यकाळात रुग्ण सापडल्यानंतर कंटेन्मेंट झोन बनवणे, सॅनिटायझेशन करणे, बाजारातील गर्दी कमी करण्यासाठी कारवाई करणे आदी त्यांच्या अधिकारातील उपाययोजना झाल्या आहेत. त्यांच्या कार्यकाळात शहरातील विकासकांनाही वेग आला होता. यामुळे मुख्याधिकारी डहाळे यांना पुन्हा पदभार द्यावा, अशी मागणी नगरसेवक कोठारी यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

खालील व्हिडीओत पहा पिंटू कोठारी नेमके काय म्हणालेत ते ?

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/556934388522725

Protected Content