जळगाव, प्रतिनिधी । वाचन हा स्पर्धा परीक्षेचा आत्मा असून नियोजन, नियम व उदिष्ट ठरवून विद्यार्थी मेह्नेत जिद्द, कठीण परिश्रमाच्या आधारे हवे ते यश संपादन करू शकतात. यश मिळेपर्यंत प्रयत्नशील असावे असे प्रतिपादन पंकज कला आणि विज्ञान महाविद्यालयाचे सहायक प्राध्यापक डॉ. संजय पाटील यांनी केले.
ते विवेकानंद प्रतिष्ठान संचालित कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयात ‘स्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना’ या विषयावर विशेष मार्गदर्शन करतांना बोलत होते. प्रा. डॉ. संजय पाटील यांनी विद्यार्थ्यांचे जगणे हे त्यांच्या विचारातून घडते त्यासाठी त्यांनी विचाराचा, कार्याचा आणि बुद्धीचा फायदा आपल्याबरोबरच समाजाला करून देण्यासठी प्रयत्नशील असले पाहिजे असे आवाहन केले. पुढे बोलतांना प्रा. डॉ. पाटील म्हणाले की, विद्यार्थ्याच्या विकासात पालकाचे महत्त्व आणि सामाजिक बंधीलीकी स्पष्ट करून स्पर्धा परीक्षाचे मार्गदर्शन केले. कृत्रिम बुद्धिमत्ता व राज्य लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग या परीक्षांची संपूर्ण तयारी कशी करावी याबाबत सादोहरण स्पष्टीकरण केले. यश मिळेपर्यंत प्रयत्नशील असावे हे नमूद केले. त्याबरोबर त्यांनी चांगल्या सवयी आणि चांगली संगती ह्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समर्पक उदाहरणासहीत सांगितले.
सूत्रसंचालन डॉ. प्रा. वैजयंती चौधरी यांनी केले. मान्यवरांचा परिचय प्रा. हितेंद्र सरोदे यांनी केले आणि आभार प्रा. आशा पाटील यांनी मानले.