भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील कजगाव येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या धडाडीच्या नेत्या सौ.वैशाली नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी नंदनवन कॉम्प्लेक्स सृजन हॉस्पिटल येथे नि:शुल्क मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले होते.
प्रथमतः दीपप्रज्जवलाने शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. कजगाव व पंचकोशीतील लोकांसाठी सौ. वैशाली सुर्यवंशी यांनी मोफत मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन वयोवृद्ध व्यक्तींना नवीन दृष्टी प्रदान करण्याचा एक संकल्पच हाती घेतला आहे.जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिला रुग्णांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या. ज्या लोकांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट आहे. अशा गरजू लोकांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करून सुमारे 180 रुग्णांची तपासणी जळगाव येथील नेत्रचिकित्सक डॉ.जॅकी शेख,डॉ. विष्णू पाटील व त्यांचे सहकारी डॉ. विनोद पाटील यांच्याकडून करून घेतली.त्यातील जवळपास 37 रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी जळगाव येथील प्रसिद्ध कांताई नेत्र चिकित्सालय या ठिकाणी पाठविण्यात आले.रुग्णांची तपासणी,जळगाव येथे येण्या – जाण्याचा तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा संपूर्ण खर्च सौ. वैशाली सुर्यवंशी करीत आहेत.
याप्रसंगी अरुण पाटील शेतकरी नेते, संदीप जैन, युवा सेना, श्रुती ताई धाडीवाल (उपसरपंच), राजेंद्र चव्हाण, दिनेश पाटील, अनिल महाजन, गुलाब महाजन, अनिल जगताप, वाल्मीक पाटील बोदर्डे, अरुण पाटील निंभोरा, नाना पाटील वाडे, दीपक पाटील, सुनील पाटील भोरटेक, आबा नाव्ही भोरटेक,जे. के. पाटील, सुनील पाटील ,अरविंद पाटील आदि सर्व पदाधिकारी उपस्थित होते.