जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील कंडारी येथे वाहनाचा हार्न वाजविल्याच्या कारणावरून दुध विक्रेत्याला तीन जणांनी शिवीगाळ करून विट मारून जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, गणेश सुभाष जाधव (वय-३५) रा. कंडारी ता. जि.जळगाव हा तरूण दुध विक्री करण्याचे काम करतो. त्याच्यावर त्याचा उदरनिर्वाह सुरू आहे. रविवारी २४ जुलै रोजी सकाळी ७ वाजता गणेश जाधव हा दुध विक्री करत असतांना हार्न वाजवीला होता. याचा राग आल्याने गावात राहणारे सलमान हुसेन पिंजारी (वय-३०), इमाम हुसेन पिंजारी (वय-३५) आणि जरीनाबी हुसेन पिंजारी (वय-४५) यांनी शिवीगाळ करून जमीनीवर पाडले. तसेच बाजूला असलेली विट गणेशच्या छातीवर मारून फेकली. यात गणेश जखमी झाला. याप्रकरणी गणेश जाधव याने दिलेल्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात सलमान हुसेन पिंजारी, इमाम हुसेन पिंजारी, जरीनाबी हुसेन पिंजारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय जाधव करीत आहे.
कंडारीत दुध विक्रेत्याला तिघांकडून मारहाण
2 years ago
No Comments