रावेर, प्रतिनिधी । निंभोरासिम,ऐनपुर,खानापुर,या गावांच्या कंटेनमेंट झोनची आज प्रांतधिकारी डॉ अजित थोरबोले यांनी पाहणी केली. यावेळी कंटेनमेंट झोन मोडणा-यांवर तसेच होम क्वारंटाईन असणाऱ्यांनी घरा बाहेर निघाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निंभोरासिम या गावातील संपूर्ण नागरीकांचे आरोग्य सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यानंतर प्रांतधिकारी ऐनपुर गावाला भेट देऊन खानापुरला देखिल भेट देणार आहेत. प्रांताधिकारी डॉ. थोरबोले यांनी विविध सूचना दिल्यात. त्यांच्या सोबत तहसिलदार उषाराणी देवगुणे, बिडिओ डॉ. सोनिया नाकाडे देखिल आहेत.