औरंगाबाद (वृत्तसंस्था) औरंगाबाद जिल्ह्यात आज 41 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1117 झाली आहे. तर कोरोनामुळे मृत्यूची संख्या 38 वर पोहोचली आहे.
इंदिरा नगर बायजीपुरा येथील 80 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. त्यांना 14 तारखेला घाटीत भरती करण्यात आले होते आणि 14 तारखेलाच अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांना पंधरा वर्षांपासून उच्च रक्तदाब होता. आज सकाळी 6 वाजता त्यांचा मृत्यू झाला आहे. तर जयभीम नगरमधल्या 55 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. काल संध्याकाळी यांचा मृत्यू झाला आहे.