पहूर येथे जनता कर्फ्यू बंदला ग्रामस्थांनी दिला पाठिंबा

पहूर, ता.जामनेर । जगभरात कोरोना या विषारी व्हायरस ने थैमान घातले आहे. भारतातही या विषाणू चा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने खबरदारी चे उपाय अवलंबविले आहे. खबरदारी म्हणून राज्यभरात आठवडे बाजार, माँल, सिनेमा गृहे तसेच जेथे गर्दी होईल ते सर्व व्यवसाय, उद्योग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाने साऱ्या जगात थैमान घातले आहे. अनेक देशांतील सरकार व नागरिक जनता वेगवेगळ्या पद्धतीने कोरोनावर मात करण्यासाठी झटत आहे. त्यामुळे खबरदारी चा उपाय म्हणून संपूर्ण भारतात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिनांक 22 मार्च जनता कर्फ्यू बंदचे आवाहन करण्यात आले होते. यानुसार आज सकाळपासून पहूर बसस्थानक परिसरातील सर्व दुकाने बंद होते. पहूर येथील सर्व नागरीक घरातच बसून होते. सर्व दुकाने बंद असल्याने व सर्व ग्रामस्थ नागरिक घरातच असल्याने सर्वत्र शुकशुकाट होता. गावातील दवाखाने ,मेडाकल स्टोअर्स, जीवनावश्यक सेवा सोडून सर्व दुकाने शंभर टक्के बंद होती.

पहूर पोलिस स्टेशनच्या वतीने जनजागृती
कोरोना या विषारी व्हायरस ने थैमान घातले आहे. यावर अंकुश मिळविण्यासाठी जनता कर्फ्यू बंदला पहूर येथे प्रतिसाद मिळाला. पहूर पोलिस स्टेशन चे साहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिह परदेशी, पीएसआय किरण बर्गे साहेब, व त्यांच्या सहकाऱ्यांनी गावात गाडी घेऊन कुणीही घराबाहेर निघू नये यासाठी वारंवार आवाहन करत होते.जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डाॅ. अविनाशजी ढाकणे सोबत यांच्या आदेशानुसार कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर तसेच जमाव बंदी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही पहूर पोलीस स्टेशनचे एपीआय राकेश परदेशी यांनी लाईव्ह ट्रेन्डस न्युजशी बोलताना सांगितले. कोरोनासारख्या महाभयंकर आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी जनता कर्फ्यू बंदचे आवाहन करण्यात आले होते, त्यानुसार येथील बसस्थानक परिसर, बाजार पेठ, पहूर पेठ, पहूर कसबे, गावात सर्वत्र शुकशुकाट दिसत होता.  

जिल्हाअधिकारी  डाॅ. अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शक सूचनेवरून जगभरात कोरोना व्हायरस ने थैमान घातले आहे. त्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्रात साथरोग प्रतिबंध कायदा 1887 लागू झाला असून आरोग्याच्या दृष्टीने गर्दी होईल म्हणून पानटपरी तसेच सर्व व्यापारी आपल्या दुकानाच्या आजुबाजुला साफसफाई ठेवणे तसेच दिनांक 31/03/2020 दुकाने बंद ठेवण्यात यावी. अशा आशयाचे लेखी सुचना पहूर पेठ व पहूर कसबे ग्रामपंचायतच्या वतीने व सर्व ग्रामपंचायत सदस्य पहूर पेठ व पहूर कसबे च्या वतीने करण्यात आली आहे. पोलीसांकडून वारंवार आवाहन करण्यात येत असून सर्वच अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आपली सेवा बजावतांना दिसत आहे.

 

jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update, live trends jalgaon, live trends news jalgaon, jalgaon corona news today,
livetrends jalgaon, covid19 e pass jalgaon, jalgaon latest news

Protected Content