पुणे, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या १ मे रोजी होणाऱ्या औरंगाबादच्या सभेत काळे झेंडे दाखविण्याचा इशारा सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाकडून देण्यात आला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ३ मे पर्यंत मशिदीवरील भोंगा काढले नाही तर आम्ही तिथे हनुमान चालीसा लावून असे विधान केले. राज ठाकरे यांचे विधान दोन समाजात तेढ निर्माण करणारे असून भाजपा राज ठाकरे यांच्यामाध्यमातून हि खेळी खेळत आहे. राज ठाकरे यांनी यावर बोलण्यापेक्षा सर्व सामन्याच्या प्रश्नावर बोलावे, अन्यथा त्यांच्या १ मे रोजी औरंगाबाद येथे होणार्या राज ठाकरेच्या सभेत आम्ही काळे झेंडे दाखवू, असा सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे अशोकराव जाधव,अजहर तांबोळी आणि ताज सिद्दीकी यांनी पुण्यामधील पत्रकार परिषदे दिला आहे या महिन्यामध्ये राजकीय मंडळीकडून इफ्तार पार्टीचे आयोजन केले जात आहे. त्यावर देखील मुस्लिम समाजातील प्रत्येकाने बहिष्कार टाकण्याचे आवाहन सोशल डेमोक्रॅटिकच्या सदस्यांनी यावेळी केले.