ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ नुकसान भरपाई द्या !

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुका ओला दुष्काळ जाहीर करून पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणीचे निवेदन आम आदमी पार्टीच्या वतीने अमळनेर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अतिवृष्टीत शेतकऱ्याचे पीक नव्हे तर संसार वाहून गेला असताना त्यांना कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नाही, कापूस व अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले असताना कृषी विभागाचे अधिकारी, तलाठी व प्रशासन पंचनामा करायला येत नाहीत. फोटो काढून पाठवा असे सांगतात. ही मनमानी बंद व्हायला हवी कारण अनेक शेतकरी बांधवांना ऑनलाईन काही समजत नाही, तसेच प्रत्यक्ष पंचनामे झाल्यावर सत्य परिस्थिती दिसते. म्हणून प्रत्यक्ष पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्या, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.

याप्रसंगी आपचे राज्य सचिव धनंजय शिंदे, जिल्हाध्यक्ष प्रा. तुषार निकम, अमळनेर तालुकाध्यक्ष संतोष पाटील, प्रा. गणेश पवार, नाना पाटील, राजेंद्र पाटील, भागवत बाविस्कर, स्वप्नील पाटील, नंदु पाटील, रामकृष्ण देवरे, महेंद्र साळुंके, सलीम वायरमन, मुकेश राजपूत, संजीव पाटील, उमाकांत ठाकूर, शहर व तालुका पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री, प्रांत, तहसीलदार, कृषी अधिकारी व सर्व संबंधित लोकांना निवेदन देऊन मागणी केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देखील निवेदनातून केला आहे.

Protected Content