जळगाव प्रतिनिधी । राज्यात ओबीसी राजकीय आरक्षण लागू होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे ढकलाव्यात या मागणीसाठी भाजपाच्या वतीने जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील महाविकास आघाडील सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षण टिकविण्यासाठी आद्यादेश काढून ओबीसी समाजासोबत असल्याचा बनाव केला आहे. हा अद्यादेश सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही अशी शंका ओबीसी समाजात होती. दरम्यान सरकारला ओबीसीचा इम्पेरियल डेटा गोळा करण्याकरीता आयोग गठीत करूनही अद्याप अहवाल महाविकास आघाडीने सादर केला नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने अद्यादेशाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे ६ डिसेंबर रेाजी राज्य शासनाने काढलेल्या अद्यादेशाला सुप्रिम कोर्टाने स्थगिती दिली आहे. त्याच बरोबर जोपर्यंत राज्य सरकार ओबीसींचा डेटा उपलब्ध करून देत नाही आणि ओबीसींना आरक्षण देवून न्याय मिळत नाही तोपर्यंत होवू घातलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका घेवू नये या मागणीसाठी जळगाव भाजपा महानगरच्यावतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, मनपा स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, माजी उपमहापौर अश्विन सोनवणे, मनपा गटनेते भगत बालाणी, नगरसेवक विशाल त्रिपाठी, नगरसेविका उज्वला बेंडाळे, अॅॅड. सुचिता हाडा, दीपमाला काळे, मनोज काळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
भाग १
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/648092716562476
भाग २
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/450316596441034