ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतकर्‍यांकडून धान्य खरेदी

रावेर प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील ऑनलाईन नोंदनी केलेल्या २६५ शेतकर्‍यांची दोन कोटी आठ लाख ९३ हजार ३८० रुपयांची ज्वारी व मका खरेदी करण्यात आली आहे.

यामध्ये ज्वारी १ कोटी ८४ लाख ९ हजार ६८० तर मका २४ लाख ८३ हजार ७०० रुपयांची खरेदी केली आहे. गत वर्षाच्या तुलनेत मक्याची खरेदी कमी प्रमाणात झाली असुन ज्वारीची खरेदी अपेक्षेपेक्षा जास्त शेतकर्‍यांनी शासकीय भावात विक्री केली. यामध्ये ७ हजार ५७६ क्विंटल ज्वारी तर १ हजार ४६१ क्विंटल मका खरेदी विक्री संघातर्फे खरेदी करण्यात आली आहे. ३१ डिसेंबर २०१८ अखेर पर्यंत खरेदी झालेल्या ज्वारी व मकाचे १ कोटी ५९ लाख ४८ हजार ३३० रुपये शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग केले आहे तर १ जानेवारी नंतर खरेदी केलेल्या ज्वारीचे ४९ लाख ४५ हजार ५० अजून येणे बाकी आहे यासाठी खरेदी विक्री संघाचे मॅनेजर विनोद चौधरी, ग्रेडर प्रशांत पाटील, यांनी शेतकर्‍यांना सहकार्य केले.

Add Comment

Protected Content