एस . टी . कर्मचारी पतसंस्थेच्या शाखा व्यवस्थापकाचा माफीनामा

 

 

जळगाव : प्रतिनिधी । एसटी कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयात डॉ  बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांची  जयंती साजरी करून त्यांना अबिवादन न केल्याच्या चुकीबद्दल या पतसंस्थेच्या शाखा व्यवस्थापकाने माफी मागितली आहे

जळगाव जिल्हा एसटी कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयात डॉ  बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या जयंती  निमित्त  कोणताही कार्यक्रम साजरा करण्यात आला नाही. या महापुरुषांच्या प्रतिमेस माल्यार्पणदेखील करण्यात आले नसल्यामुळे एसटी कर्मचारी संतप्त झाले होते.

यासंदर्भात कास्टराईब संघटनेचे विभागीय सचिव शैलेश नन्नवरे ,  कामगार सेनेचे प्रसिद्धी सचिव गोपाळ पाटील यांच्यासह  अजय पाटील, गणेश पाटील, धनराज बनसोडे, दशरथ बनसोडे, शिरीष नन्नवरे, प्रेमा सपकाळे, कुणाल पवार, वामन अहिरे  आदी  कर्मचाऱ्यांनी एसटी पतसंस्थेच्या  संचालकांना व सेक्रेटरीला दोषी धरले   त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी  करीत त्यांची तक्रार जिल्हाधिकारी  यांच्याकडे करण्यात आली.

यासंदर्भात एसटी कर्मचाऱ्यांनी  या पतसंस्थेच्या कार्यालयाला  भेट दिली त्यावेळी  या महापुरुषांच्या प्रतिमांना स्वच्छ करण्याची तसदीदेखील सोसायटीच्या कर्मचाऱ्यांनी घेतली नसल्याचे दिसून आले.  जळगाव ,  धुळे ,  नंदुरबार .  नाशिक या चारही जिल्ह्यात व्याप असलेल्या या  पतसंस्थेचे  जवळपास पाच हजार पेक्षा जास्त सभासद आहेत. याबाबत सोसायटीचे चेअरमन पंडित बाविस्कर यांनी खेद व्यक्त केला. शाखा व्यवस्थापक प्रदीप विसपुते यांनी झालेल्या प्रकाराबाबत क्षमा मागून इतर कर्मचाऱ्यांसोबत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण केले.

Protected Content