एस.एस.एम.एम महाविद्यालयाची भारती राठोड विद्यापीठात द्वितीय

 

पाचोरा, प्रतिनिधी । येथील एस.एस.एम.एम महाविद्यालयातील इतिहास विभागातील विद्यार्थीनी भारती भास्कर राठोड हिने क. ब. चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात  एम. ए. द्वितीय परीक्षेत द्वितीय क्रमांक मिळवून महाविद्यालयाची यशाची परंपरा कायम राखली आहे. 

भारती राठोड हिने १० पैकी ९.१३ गुणांची कमाई करत विद्यापीठात द्वितीय क्रमांक पटकवला आहे. तीचे एस.एस.एम.एम महाविद्यालयातर्फे  पुष्पगुच्छ देऊन सत्कार व अभिनंदन करण्यात आले.  याप्रसंगी माजी प्राचार्य डॉ. बी. एन. पाटील, प्रभारी प्राचार्य डॉ. वासुदेव वले, इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ.  जे. डी. गोपाळ, प्रा. माणिक पाटील, प्रा. अजय थेपडे,  प्रा. राजेश वळवी, राजेंद्र वामन पाटील आदी उपस्थित होते. भारती राठोड हिला पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ, व्हाईस चेअरमन व्ही. टी. जोशी यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या विद्यार्थीनीला प्रा. डॉ. जे. डी. गोपाळ,  प्रा.माणिक पाटील प्रा. डॉ. पी. एस. देशमुख, प्रा. नरसींग परदेशी आदींचे मार्गदर्शन लाभले. भारती राठोड हिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

 

 

 

Protected Content