एसपी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी गुंडागर्दी केली नाही, तर दुसरे गुंडे तयार होतात : नांदेड जिल्हाधिकारी

नांदेड (वृत्तसंस्था) जिल्ह्यात मी आणि एसपी हे दोनच गुंड आहेत. तर या दोन गुंडांनी गुंडागर्दी केली नाही, तर दुसरे गुंडे तयार होतात, असे वादग्रस्त वक्तव्य नांदेडचे नवे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटकरांनी एका जाहीर कार्यक्रमात केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

 

नांदेडचे नूतन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नुकताच नांदेडच्या कार्यभार स्वीकारला. यावेळी त्यांनी या दोन गुंडांनी गुंडागर्दी केली नाही, तर दुसरे गुंडे तयार होतात, असे म्हटले. शुक्रवारी (28 फेब्रुवारी) रात्री मावळते जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचा निरोप समारंभाच्या कार्यक्रमात इटनकर बोलत होते. इटनकर म्हणाले, जिल्ह्यात केवळ दोनच गुंड असतात. एक म्हणजे जिल्हाधिकारी आणि दुसरा म्हणजे पोलीस अधीक्षक (एसपी). या दोन गुंडांनी गुंडागर्दी केली नाही, तर दुसरे गुंड तयार होतात. त्यामुळे अशाचप्रकारे मी आणि पोलीस अधीक्षक आम्ही दोघे गाडीच्या दोन चाकांप्रमाणे हा जिल्हा चालवू, असेही इटकर म्हणाले.

Protected Content