खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत जमावबंदी लागू !

मुंबई (वृत्तसंस्था) दिल्लीत तणावपूर्ण शांतता असली तरी त्याचे पडसाद इतरत्र उमटू नयेत यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत येत्या ९ मार्चपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

 

मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आदेशानुसार ९ मार्चपर्यंत मुंबईत कुठल्याही प्रकारचा मोर्चा काढण्यावर बंदी असेल. पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही. जमाव करून ध्वनीवर्धकाचा वापर करता येणार नाही. पोलिसांच्या पूर्वपरवानगीनंतर अपवादात्मक परिस्थितीत एखाद्या कार्यक्रमाला परवानगी मिळणार आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (सीएए) मुद्द्यावरून दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारात ४२ हून अधिक बळी गेले आहेत. आता दिल्लीत तणावपूर्ण शांतता असली तरी त्याचे पडसाद इतरत्र उमटू नयेत यासाठी खबरदारी घेतली जात आहे. मुंबईतही गेल्या काही दिवसांपासून सीएएच्या मुद्द्यावर मोर्चे निघत आहेत. त्यातून काही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांनी जमावबंदी आदेश लागू केले आहेत.

Protected Content