एसटी बँकेत कर्मचारी , सभासद विमा योजनेत ८३ लाखाच्या भ्रष्टाचाराचा आरोप

 

जळगाव : प्रतिनिधी । एसटी बँकेत कर्मचारी , सभासद विमा योजनेत ८३ लाखाच्या भ्रष्टाचाराचा आरोप  करीत   संचालकांसह दोषी अधिका-यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी कामगार सेनेने केली आहे . .

 

एस टी कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की , एसटी बँकेतील विद्यमान संचालक मंडळाला कोविड-१९ च्या प्रादुर्भावात निवडणूक स्थगित करुन  राज्य शासनाने मुदतवाढ दिली.  त्याचा गैरफायदा घेवुन एसटी बँकेला ओरबाडण्याची एकही संधी न  सोडणा-या संचालक मंडळाच्या सभासद विमा योजनेतील ८३ लाख रुपयाच्या भ्रष्टाचाराची तक्रार महाराष्ट्र एसटी कामगार सेनेने केली राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे केली  आहे..

 

एसटी बँकेने कर्मचारी व सभासदांसाठी  कर्मचारी किंवा  सभासदांचा नैसर्गिक व अपघाती मृत्यू झाल्यावर त्यांच्या वारसांना विमा योजनेतून आर्थिक लाभ मिळावा या हेतुने  विमा योजना सुरू केली होती. योजना न्यु इंडिया ईन्शुरन्स कंपनी द्वारे राबविण्यात येत होती. योजनेची मुदत  ७ मार्चला संपुष्टात आली मुदत संपण्याअगोदरच एसटी बँकेने कर्मचारी , सभासदांच्या विम्याचे नुतनीकरण करणे गरजेचे होते.

 

एसटी बँक व्यवस्थापनाने  विमा योजना पुढे चालु ठेवण्यासाठी ई निवीदा मागवणे अथवा ज्या कंपनीशी यापुर्वी केलेल्या  कराराला मुदतवाढ देणे बंधनकारक होते. परंतु एसटी बँक व्यवस्थापनाने तसे न करता बंद लिफाफ्यात निविदा  मागविल्या होत्या. चार ईन्शुरन्स कंपनींनी  निवीदा सादर केल्या होत्या. या निविदांची पार्दशकता राखण्यासाठी निविदाकारांच्या समक्ष बंद लिफाफ्यातील निवीदा उघडणे क्रमप्राप्त होते. परंतु तसे न करता बँक व्यवस्थापनाने चार संचालकांची एक समीती स्थापन करुन एसटी बँकेच्या मुंबई येथील मुख्य कचेरीत न उघडता व निवीदाकाराला न बोलावता निविदा  १२ मार्चरोजी परस्पर पुणे येथील हाॅटेल कलासागर येथे उघडल्या.

 

चार निविदाकार ईन्शुरन्स  कंपन्यांनी सादर केलेल्या निविदा उघडल्यावर सर्वात कमी दराची रु १८० प्रति विमाधारक प्रमाणे मे. राघनाल ईन्शुरन्स ब्रोकिंग अॅण्ड रिस्क मॅनेजमेंट प्रा.लि. या कंपनीची निवीदा निघाली ती इतर तीन कंपनीच्या  तुलनेत किफायतशीर  दराची होती. ईतर कंपनीच्या निविदा व मे. राघनाल ईन्शुरन्स अॅण्ड रिक्स मॅनेजमेंट या कंपनीची निवीदा यात मोठी तफावत निदर्शनास आल्यावर मलीदा लाटण्यासाठी चार संचालकांची कमेटी व मुख्य कचेरीतील दोन अधिकारी यांनी  शिर्डी येथील मे. राघनाल ईन्शुरन्स अॅण्ड रिक्स मॅनेटमेंट या  कंपनीच्या ब्रोकरला १८० रुपयांची निवीदा बदलुन २८० रुपयांची निवीदा सादर करण्यासाठी पुणे येथील हाॅटेल कलासागर येथे पाचारण केले नंतर निविदा कागदपत्रावर सह्या व ईतर वाटाघाटी करण्यासाठी मुंबई येथील हाॅटेल ट्रायडंट येथे डील झाली. नंतर घाईघाईने  १५ मार्चच्या  संचालक मंडळाच्या  बैठकीत ही निवीदा मंजुर करण्यात आली.

 

संचालक मंडळाच्या बैठकीपुर्वी महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे सरचिटणीस  हिरेन रेडकर यांनी ही बाब बँकेचे  उपाध्यक्ष व एसटी  महामंडळाचे वित्तीय सल्लागार व मुख्य लेखाअधीकारी यांच्या निदर्शनास आणुन दिली होती व चर्चा केली होती. परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आले.  या  संदिग्ध हालचाली, निविदा प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव व हाॅटेल ट्रायडंट मध्ये झालेल्या वाटाघाटीवरुन विमा योजनेत  भष्टाचार झाला आहे  याची निष्पक्ष चौकशी करुन दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी हिरेन रेडकर यांनी केली आहे

 

. ७ मार्च  ते १५ मार्च पर्यंतच्या कालावधीत कर्मचारी , सभासदाचा मृत्यू झाला असेल तर  त्यांच्या वारसांना द्यावा लागणा-या विम्याचा  भुर्दंड एसटी बँकेवर न टाकता संबंधित दोषी संचालक व अधिकारी यांच्या कडुन वसुल करावा अशी मागणी महाराष्ट्र एसटी कामगार सेनेने उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तथा एसटी बँकेचे पदसिद्ध अध्यक्ष  शेखर चन्ने  यांच्याकडे लेखी तक्रार देवुन केली आहे.

 

निष्पक्ष चौकशी करण्यापूर्वी या भ्रष्टाचारात सहभागी असलेल्या दोन्ही एसटी बँकेतील वरिष्ठ अधिका-यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र एसटी कामगार सेनेने केली आहे..

 

याबाबतची दुसरी लेखी तक्रार विंश्युअर सोल्युशन  ईन्शुरन्स अॅडव्हायजर मुंबई या एका निवीदाकार कंपनीने देखील एसटी बँकेचे पदसिध्द अध्यक्ष तथा उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्या कडे केली आहे..

Protected Content