एरंडोल प्रतिनिधी । येथील गांधीपूरा भागातील मारोती मंदीराच्या बांधकाम अपुर्णावस्थेत असल्याने ते पुर्ण करण्यासाठी मुंबईस्थित तथा एरंडोल येथील रहिवाशी सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र साळी यांनी एक लाखाची देणगी दिली आहे.
शहरातील गांधीपुरा भागातील पद्मालय दरवाजा स्थित मराठी शाळा क्र.२ जवळील पुरातन मारोती मंदिराचे गेल्या अनेक दिवसांपासून बांधकाम अपुर्ण अवस्थेत होते. त्यास पुर्ण करण्यासाठी मुंबई स्थित व मुळ एरंडोल चे रहिवाशी असलेले बिग बाजारचे जनसंपर्क अधिकारी तथा किर्गीझस्थानसाठी देशाचे शासकीय प्रतिनिधी असलेले व सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र साळी यांनी एक लाख रुपये देणगी दिली असुन त्यांच्या सोबत असलेले एरंडोल येथील धनश्री स्टोन क्रॅशर चे मालक उद्योजक कुशल तिवारी यांनी देखील मंदिराच्या बांधकामासाठी दगड,विटा,खडी इतर साहित्य मोफत देण्याचे जाहीर केले.
सदर मंदिर हे पुरातन असुन त्याचा बांधकाम करण्यासाठी शहरातील तथा बाहेरील अनेक सामाजिक कार्यकर्ते व भक्तांनी थोडी थोडी मदत करुन मंदिर पुर्ण करण्याचा प्रयत्न केला होता परंतु तरीही ते पुर्ण होऊ शकले नव्हते हे जेंव्हा देवेंद्र साळी यांच्या लक्षात आले तर त्यांनी मंदिराच्या विश्वस्त मंडळास भेटुन एक लाख रुपये देणगी दिली.
यावेळी देवेंद्र साळी, कुशल तिवारी, माजी उपनगराध्यक्ष सुनिल चौधरी, सामाजिक कार्यकर्ते दशरथ बडगुजर, कैलास वंजारी, संजय पाटील, आय.टी.आय.चे प्राचार्य प्रा.सुधीर महाजन, सुरेश चौधरी, उमेश बडगुजर, रवि वंजारी, श्रीराम पाटील, निलेश पाटील, तुषार वाघ आदी उपस्थित होते.