लंपी आजारावर साकळी ग्रामपंचायतीद्वारे उत्तम उपाययोजना

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनीधी | लंपी स्कीन या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर नुकतीच जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी तालुक्यातील साकळी  येथे अचानक भेट देवून ग्रामपंचायतीने राबविलेल्या लंम्पी आजार प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचे कौतुक केले.

 

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी ३० ऑगस्ट रोजी साकळी गावाला भेट दिली. याप्रसंगी यावल तहसीलदार महेश पवार,तालुका वैद्यकीय अधिकारी एस.एन.बढे हे अधिकारी सुद्धा उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी लंम्पी आजाराबाबत व लसीकरणाबाबत माहीती घेतली. साकळी येथील राजू तायडे यांच्या गोठ्यातील लंम्पी आजारग्रस्त गुरांची पाहणी केली तसेच  वेळीच उपचार मिळाल्यानंतर त्या जनावरांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याने समाधान व्यक्त केले. त्याचप्रमाणे गावात संपूर्ण गाय व म्हैस वर्गीय जनावरांना लसीकरण केल्याबद्दल समाधन व्यक्त केले. ग्रामपंचायत प्रशासन व पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून लसीकरण मोहिमेची सविस्तर माहीती घेऊन गुरांचा गोठा स्वच्छ ठेवण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायतीने स्वच्छ गोठा स्पर्धा आयोजित करावी. त्यामुळे पशुपालकांना गोठा स्वच्छ करण्याची सवय लागेल आणि स्वच्छतेमुळे जनावरांचा आरोग्य सुद्धा चांगले राहील. पशुपालकांनी मुक्त गोठा पद्धतीचा अवलंब ही  करावा असे ही जिल्हाधिकारी राऊत यांनी आवर्जून सांगितले. साकळी येथील लंम्पी लसीकरण मोहिमेबाबत व लंम्पी आजाराच्या संसर्गाबाबत पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. युवराज पाटील तसेच यावलचे पशुधन पर्यवेक्षक वाय. जी. नेवे सविस्तरपणे माहिती दिली.

यावल तालुक्यात सर्वात आधी प्रशासनाच्या मदतीची वाट न पाहता साकळी ग्रामपंचायतीने राबविलेल्या लंम्पी आजार प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचे जिल्हाधिकारी राऊत यांनी कौतुक केले व साकळी ग्रामपंचायतीप्रमाणे इतरही ग्रामपंचायतींनी पुढाकार घेऊन आपआपल्या गावात गाय व म्हैस वर्गीय जनावरांना लंम्पी आजार प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. या भेटी दरम्यान कृउबाचे माजी संचालक विलास नाना पाटील व राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दिपक पाटील हे ही उपस्थित होते.

 

Protected Content