एरंडोल, प्रतिनिधी । एरंडोल येथील डॉ. एन. डी.पाटील व नगरसेविका जयश्री पाटील यांनी आपल्या गोशाळेत राजलक्ष्मी (गोमाता) चा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम मान्यवरांचे उपस्थितीत साजरा करण्यात आला.
भारतात हिंदु धर्मात गोमातेचे महत्व असून एरंडोल येथे या महत्वाचा वेगळाच अनुभव दिसुन आला. गोमाता प्रेम , भक्तीभाव जिव्हाळा आहे. दारापुढे गाय असणे भाग्याचे लक्षण तर गोशाळा चालवून खरा भक्तिभाव जोपासला जातो. आपल्या घरी लेक अथवा सुनेचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम सारखाच कार्यक्रम घडवून आणल्याने शहर, परिसरात गोमातेबद्दल असलेला जिव्हाळा, प्रेम भक्ती अनेकांना प्रेरणादायक ठरला आहे. गायत्री धाम सेंधवा येथून पंडीतजीनी ३ वर्षापुर्वी दिलेल्या राजलक्ष्मी नावाच्या वासरी गोमातेची (वय अवघे ६ महिने) उत्तम जोपासना करून जीव लावला. आज धरणगांव रोडवरील राजलक्ष्मी गोमातेच्या माध्यमातून पदमालय गाऊगीर विज्ञान केंद्रात ५० गोमाता गोशाळा बहरली आहे. विशेष म्हणजे राजलक्ष्मी ७ माहिन्यांची गर्भवती असल्याने तिचा डोहाळे जेवणाचा छानसा कार्यक्रम गोशाळेत पंडीतजी, दीदी बंटीभाई, पुजा दीदी, देविदास बिर्ला यांचेसह निवृत्त मुख्याध्यापक डी.एस.पाटील, नगरसेविका जयश्री पाटील, ललीत मुक्ता भारती पाटील, विक्रीकर आधिकारी राजेद्र पाटील, गोसेवक तुळशिराम पावरा आदींच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी – राजलक्ष्मीला सुंगधी उटणे आदी लावून स्नान करून गळ्यात फुलांच्या माळा घालण्यात आल्या. पंडीतजीसह मान्यवरांनी गोमातेला गोड पदार्थ खाऊ घालून विधीवत मंत्रोच्यारात डोहाळे जेवणाचा कार्यक्रम संपन्न झाला. एरंडोल शहर परिसरात प्रथमच आगळा – वेगळा कार्यक्रम संपन्न झाल्याने सर्वत्र कौतुक होत आहे. सदर गोशाळेला दररोज भेट देणाऱ्यांची उत्सुकतेने संख्या वाढू लागली आहे. डॉ.दाम्पत्याच्या अनोखा कार्यक्रमाची सर्वत्र चर्चा होत आहे .