एरंडोल येथील ब्राईट फाउंडेशनतर्फे गरजूंना मदत

 

एरंडोल, प्रतिनिधी । कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी लॉक डाऊन जाहीर करण्यात आला आहे. यात हातावर पोट असणाऱ्या लॉक डाऊनकाळात काम नसल्याने त्यांची उपासमार होत आहे. याची सामाजिक जाणीव ठेवून इस्लामपुरा भागातील ब्राईट फाउंडेशनतर्फे गरजूंना धान्याची मदत करण्यात आली.

सध्या लॉक डाऊन असल्याने मजुर व गरीब लोकांचे खुप हाल होत आहेत. यातच अनेक दाते हे आपल्या परीने हवी तशी मदत करतांना देखील आपण बघत आहोत. याचाच प्रत्यय म्हणजे एरंडोल येथील इस्लामपुरा भागातील ब्राईट फाउंडेशनतर्फे ४ किलो गहु, ३ किलो तांदूळ,१ किलो तेल, १ किलो डाळ,१०० ग्रॅम चहा पावडर, ५०० ग्रॅम मीठ असे एकुण १५० किट गरजूंना वाटप करण्यात आले. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष नगरसेवक अब्दुल शकुर मोमीन, उपाध्यक्ष मजीद मुजावर, सचिव मोहसीन खाटीक, सदस्य आरिफ शेख, नासीर खाटीक, हाफीज मोमीन, फारुख बशीर, नाना महाजन, असलम मिस्त्री, फारुख मजीद आदी उपस्थित होते.

Protected Content