एरंडोल पोलीस स्टेशनला मिळाले दहा महिन्यानंतर पोलीस निरीक्षक

 

एरंडोल, प्रतिनिधी । एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षकपदी ज्ञानेश्वर जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल उनवणे यांच्याकडून चार्ज स्वीकारला.

एरंडोल पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरिक्षक स्वप्नील कचरू उन्नवणे यांच्याकडे प्रभारी पोलीस निरीक्षक म्हणुन चार्ज होता. जळगाव पोलिस अधिक्षक प्रविण  मुंडे यांच्या आदेशाने निंभोरा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे तर त्यांच्या जागी पिटीएस धुळे येथून हजर झालेले पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर निवृत्ती जाधव यांची एरंडोल पोलिस ठाण्यात रिक्त जागी बदली करण्यात आली आहे. याबाबत जिल्ह्यात नव्याने बदलून आलेल्या तसेच विनंती अर्जानुसार एकूण दहा निरीक्षकांसह सहा सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश बुधवारी रात्री उशिरा जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी काढले आहेत. दि.५ नोव्हेंबर रोजी एरंडोल पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल उनवणे यांच्याकडून नूतन पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांनी चार्ज स्वीकारला.

Protected Content