Home Cities एरंडोल सफाई कामगार महिलेसोबत असभ्य वर्तन व विनयभंग ; एकावर गुन्हा दाखल

सफाई कामगार महिलेसोबत असभ्य वर्तन व विनयभंग ; एकावर गुन्हा दाखल

0
350

एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यातील कासोदा गावातील एका भागात राहणाऱ्या एका ४४ वर्षीय सफाई कामगार महिलेचा विनयभंग करत जातीवाचक शिवीगाळ करून अपमानित केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित महिला ही कासोदा शहरात सफाई कामगार म्हणून कामाला आहेत. २२ मार्च रोजी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास ही महिला आपल्या घराचे लोखंडी गेट लावत होती. त्यावेळी कासोदा येथील गरीब नवाज चौकातील राहणारा संशयित आरोपी हकीम खान उर्फ काल्या जमशेर खान याने विनाकारण महिलेच्या घराच्या गेटला जोरात लाथ मारली. पीडितेने याचा जाब विचारला असता, संशयित आरोपीने तिला अश्लील शिवीगाळ केली आणि तिच्या जातीचा उल्लेख करून अपमानास्पद शब्द वापरले.

इतक्यावरच न थांबता, आरोपीने पीडितेच्या घरी जबरदस्तीने प्रवेश केला. तिथे त्याने पीडितेचा हात पकडून त्यांचा विनयभंग केला. याप्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात संशयित आरोपी हकीम खान उर्फ काल्या याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी हे करीत आहे.


Protected Content

Play sound