Home Cities एरंडोल अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; ट्रॅक्टरसह २ लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; ट्रॅक्टरसह २ लाखांचा मुद्देमाल जप्त

0
101


एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यातील रणजे बुद्रुक शिवारात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरवर महसूल विभागाने कारवाई केली आहे. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, ट्रॅक्टरसह तब्बल २ लाख ४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महसूल अधिकारी सायली विश्वास बर्गे (वय २४, रा.एरंडोल) यांनी याप्रकरणी पोलिसात फिर्याद दिली आहे. १६ मार्च २०२६ रोजी सकाळी ६:३० वाजेच्या सुमारास रणजे बुद्रुक परिसरात ही घटना घडली. ट्रॅक्टर चालक किशोर भास्कर कोळी (रा. रणजे बु.) हा विनापरवाना ट्रॅक्टरमध्ये (एमएच १९ सीजे ०९३५) वाळूची चोरी करत होता. या ट्रॅक्टरचे मालक सुरेखा विठ्ठल कोळी (रा. रणजे बु) हे आहेत.

परवाना नसतानाही अवैध पद्धतीने वाळूची वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आल्यावर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. या कारवाईत वाळू आणि ट्रॅक्टर असा एकूण २ लाख ०४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


Protected Content

Play sound