एरंडोल नगरपालिकेत विषय समिती सभापतींची निवड बिनविरोध

एरंडोल प्रतिनिधी । नगरपालिकेच्या विषय समिती सभापतीची निवड पिठासीन अधिकारी तथा तहसीलदार अर्चना खेतमाळीस यांच्या उपस्थित करण्यात आली.

यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेश मुकुंदसिंग परदेशी व इतर १६ सदस्य बैठकीस हजर होते. तसेच सन्मान, सदस्य ०७ हे गैरहजर होते. नितीन चौधरी – सार्व.बांधकाम सभापती , बानोबी गुलाब बागवान – पाणी पुरवठा व जलनिस्सारण सभापती , योगेश युवराज देवरे -नियोजन व विकास सभापती , जयश्री नरेंद्र पाटील – महिला व बालकल्याण सभापती अशा प्रकारे एकूण ४ सदस्यांनी प्रत्येकी एका समिती सभापती पदाकरिता नामनिर्देशन पत्र मुख्याधिकारी किरण देशमुख यांच्याकडे मुदतीत दाखल केले. प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी म.पिठासीन अधिकारी तथा तहसिलदार अर्चना खेतमाळीस यांनी असता सर्व नामनिर्देशन पत्र वैध ठरविले त्यानंतर माघारी करिता १५ मिनिटाचा अवधी दिला असता कोणत्याही उमेदवाराने माघार न घेतल्याने व एका पदाकरिता एकच नामनिर्देशन पत्र प्राप्त झाल्याने म.पिठासीन अधिकारी यांनी पुढील प्रमाणे समिती सभापती निवड झाल्याचे घोषीत केले.

यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेश परदेशी व तहसीलदार यांच्याहस्ते निवड झालेल्या सभापतींचा सत्कार करण्यात आला. यावेळेस मनोगत व्यक्त करतांना लोकनियुक्त नगराध्यक्ष यांनी सांगीतले की शहर विकासाकरीता सर्व पक्षांच्या सदस्यांना सोबत घेऊन व सर्वांना न्याय देऊन सभापती पदाची निवडणूक खेळीमेळीच्या वातारणात संपन्न झालेली असून यापूढे देखील कोणताही राजकीय किंवा पक्षीय भेदभाव न ठेवता संपूर्ण शहराचा विकास करण्याकरीता मी कटीबंध्द आहे . सभेच्या कामकाजात पिठासीन अधिकारी यांना मुख्याधिकारी किरण देशमुख व कार्यालय अधिक्षक संजय ढमाळ यांनी मदत केली.

Protected Content