बोदवड – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बोदवड तालुक्यातील गो.दे.ढाके माध्यमिक विद्यालय एनगाव येथील उपशिक्षक एम.पी. कोळी यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन ते एक उत्कृष्ट निवेदक व राज्यस्तरीय तज्ञ मार्गदर्शक तसेच विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून प्रोटॉन शिक्षक संघटनेकडून त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आलेली आहे. व त्यांना या वर्षाचा ४ डिसेंबर २०२२ रविवार रोजी दिला जाणारा सत्यशोधक तात्यासाहेब महात्मा ज्योतिबा फुले पुरस्कार जाहीर झालेला आहे.
यासाठी प्रोटॉन शिक्षण संघटनेचे प्रदेशअध्यक्ष काकडे सर, जिल्हाध्यक्ष मिलिंद भालेराव, मिलिंद निकम माध्यमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव व प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. तसेच या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती ओ.बी.सी मोर्चाचे राज्य कार्यकारिणी सदस्य आबासाहेब राजेंद्र वाघ, प्रोटॉन शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष, कार्याध्यक्ष संस्थेचे चेअरमन एन.डी.बोंडे, मुख्याध्यापक डॉ. पी एस गड्डम सर व संचालक मंडळाने एम.पी.कोळी यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. विद्यार्थीप्रती ध्यास, सदभावना या गोष्टी व शैक्षणिक कार्याचा आढावा घेऊन संघटनेने जो पुरस्कार देऊ केलेला आहे खरोखर उल्लेखनीय आहे मला नेहमीच शैक्षणिक कार्य करण्याची ऊर्जा मिळत राहील.