एमबीबीएस अंतिम परीक्षेत डॉ. निखिल वानखेडे यांचे यश

 

जळगाव, प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या एमबीबीएस अंतिम वर्ष परीक्षेत जळगांव येथील निखिल चंद्रकांत वानखेडे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथून ६५ % गुण मिळवून प्रथम श्रेणी उत्तीर्ण होवून  उज्वल यश संपादन केले.

डॉ. निखिल  वानखेडे यांचे माध्यमिक शिक्षण सेंट जोसेफ स्कूल व उच्च माध्यमिक शिक्षण एम.जे.कॉलेज,जळगाव येथे झाले असून एक गुणवंत विद्यार्थी म्हणून  त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे, ते चंद्रकांत भादुजी वानखेडे, निदेशक,शासकीय आय.टी. आय.चोपडा व  ज्योती वानखेडे  यांचे जेष्ठ पुत्र असून श्री.वानखेडे हौसिंग सोसायटी,जळगांव येथील रहिवासी श्री.भादुजी बालुजी वानखेडे यांचे  नातू आहे, याच वर्षी त्यांची बहीण राजश्री वानखेडे हिस मुंबई येथील नायर मेडिकल कॉलेज येथे बी.डी. एस.साठी प्रवेश मिळाल्याबद्दल दोन्ही भाऊ-बहिणीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. ते ला.ना.सा. विद्यालयातील शिक्षक .संजय वानखेडे,प्रा.हेमाक्षी वानखेडे यांचे पुतणे होत.

 

Protected Content