जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एमआयडीसी परिसरातील बाणमाता कंपनीसमोर प्लास्टीकच्या कॅनमध्ये गावठी हातभट्टीची दारु विक्री करणार्यावर एमआयडीसी पोलिसांनी मंगळवार ८ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता कारवाई केली. या कारवाईत १ हजार ५०० रुपयांची दारु हस्तगत करण्यात आली आहे. याप्रकरणी रात्री उशीरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील एमआयडीसी परिसरातील व्ही-११२ मध्ये बाणमाता इंडस्ट्रीजसमोरील पटांगणात एक जण विनापरवाना गावठी हातभट्टीची दारू विक्री करत असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यांनी तात्काळ राहुल रगडे, विजय पाटील व विशाल कोळी यांना कारवाईसाठी रवाना केले. दरम्यान पथकाने मंगळवारी ८ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता घटनास्थळी जावून धाड टाकली असता. पोलीसांनी केलेल्या कारवाईत १ हजार ५०० रुपयांची ३० लिटीर हातभट्टीची दारु हस्तगत करण्यात आली. तसेच दारु विक्री करणार्या दीपक गंगाराम सोनवणे (वय-४२, रा. वाल्मिकनगर, जैनाबाद) याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.