किरकोळ कारणावरून तरूणाच्या डोक्यात मारला लोखंडी तावा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  रिकामटेकड्या लोकांसोबत राहू नको, असे बोलल्याने एकाने बोलणाऱ्या तरुणाच्या डोक्यात लोखंडी तवा मारुन दुखापत केल्याची घटना आदर्श नगरात शनिवार, २० ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील आदर्श नगर येथे भूषण नारायण खडके वय ३४ हे वास्तव्यास आहेत. शनिवारी कुशल भरत राणे हा आदर्शनगरात खडके यांच्या घराजवळ उभा होता, यावेळी भूषण हे कुशल यास रिकामटेकड्या लोकांसोबत राहू नको, असे बोलले, त्याचा राग आल्याने कुशल राणे याने भूषण यांना चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच कुशल याने लोखंडी तवा भूषण यांच्या डोक्यात मारुन दुखापत केली, अशा भूषण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कुशल राणे याच्याविरोधात रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अजित पाटील हे करीत आहेत.

Protected Content