दारूच्या नशेत एकावर कोयत्याने वार

एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । काहीही कारण नसतांना दारूच्या नशेत एकाने तरूणावर कोयत्याने वारून गंभीर दुखापत केल्याची घटना तालुक्यातील विखरण येथे घडली आहे. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, आकाश संजय मोरे (वय-१८) रा. विखरण ता. एरंडोल हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतो. शनिवारी २० ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास आकाश हा त्याच्या घराजवळ बसलेला असतांना गावातील संतोष शिवराम मोरे हा दारूच्या नशेत आला आणि काहीही कारण नसंताना आकाशवर कोयत्याने वार केले. यात आकाशच्या कानाला दुखापत झाली आहे. त्याला खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात संशयित आरोपी संतोष शिवराम मोरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक रविंद्र तायडे करीत आहे.

Protected Content